Share

“मी तुमच्या सारखा ए-क्लास नागरिक…”; ओवेसींची नवी मागणी

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Assaduddin Owaisi) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर गुरुवारी मेरठहून दिल्लीला परताना गोळीबार झाला. या हल्ल्यात ओवेसींना कोणतीही दुखापत झाली नाही. कारच्या दरवाज्यावर ह्या गोळ्या लागल्या. याप्रकरणी गौतम बुद्ध नगर येथून सचिन आणि देवबंद, सहारनपुर येथून शुभम या आरोपींना हापुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. हे आरोपी मेरठ येथील ओवेसींच्या सभेला उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून त्यांना झेड प्लस (Z+) सुरक्षा प्रदान केली आहे. मात्र त्यांनी ती नाकारली आहे. ते आज संसदेत बोलत होते. त्यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर युएपीए कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले,’मला झेड दर्ज्याची सुरक्षा नको. मला तुमच्या सारखा ए-क्लास नागरिकाचा दर्जा हवाय. ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्या विरोधात युएपीए अंतर्गत कारवाई का होत नाही? मी जगू इच्छितो मला बोलायचे आहे. जेव्हा गरिबाचे जीवन सुरक्षित असेल तेव्हा माझे जीवन सुरक्षित असेल. माझ्यावर हल्ला झाला म्हणून मी घाबरणार नाही.’

त्यांनी प्रयागराजमध्ये झालेल्या धर्मसंसदेवर त्यांच्या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केला. तिथे त्यांना जीवे मारण्याची चर्चा झाली, असा आरोप त्यांनी केला आहे. सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही असा प्रश्न ही त्यांनी केला. त्यांनी २०१५ मध्ये मूलतत्ववाद विरोधी गट बनवण्याची मागणी केली असल्याची आठवण ही सरकारला करून दिली. मुलतत्ववादाने भारताचे राष्ट्रपिता, दोन पंतप्रधान आणि अजून अनेक सर्व सामन्यांचे बळी घेतले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!