Share

औरंगाबाद  ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी निमीत गोयल रुजू; पाटील यांनी सोपवला पदभार!

Published On: 

औरंगाबाद : राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश ९ सप्टेंबर रोजी आदेश निघाले, मात्र बदलीचे आदेश निघाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना गणेशोत्सवानंतरच रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. गणेशोत्सव झाल्यानंतर सोमवारी ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी निमीत गोयल यांनी रुजू होत मोक्षदा पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.

पाटील यांची बदली औरंगाबादेतच लोहमार्ग पोलिस अधीक्षकपदी झाली आहे. तसेच सोमवारी ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षकपदी पवन बनसोड यांनीही पदभार स्वीकारला. शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त मीना मकवाना आणि निकेश खाटमोडे पाटील यांचीही बदली करण्यात आली आहे. मीना मकवाना या उपायुक्त गुप्त वार्ता तर निकेश खाटमोडे पाटील यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.

शहर पोलिस उपायुक्तपदी उज्जवला वनकर आणि अर्पणा गिते यांची बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. सर्व अधिकारी गणेशोत्सवापर्यंत त्यांच्या पूर्वीच्याच पदावर काम करीत होते. सर्वांना गणेशोत्सवानंतरच त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याबाबत आदेश देण्यात आले होते. राज्यभरात ३७ आयएएस अधिकारी, ५४ उपायुक्त तर ९२ सहाय्यक पोलिस आयुक्त यांची बदली करण्यात आलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!