🕒 1 min read
मुंबई : कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या सदस्यांसह झालेल्या बैठकीत बोलत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना या संसर्गजन्य महामारीमुळे आपले गमावलेल्या महिलांसाठी प्राधान्याने शासकीय योजना पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यावेळी त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र योजना आखण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले आहे. कृषी विभागाच्या तसेच वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांमध्ये या महिलांना १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी समितीच्या वतीने या वेळी करण्यात आली.
बैठकीमध्ये कोरोमुळे पतीचे निधन झालेल्या राज्यातील महिलांची संख्या १५ हजारांहून अधिक असल्याचे या समितीच्या सर्वेक्षणातून समोरआले आहे. राज्यातील स्वयंसेवी संस्था व संघटनांचे प्रतिनिधी या समितीचे सदस्य आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत असलेल्या या महिलांच्या आर्थिक, सामाजिक प्रश्नांचे प्रश्न समितीने प्रकाशात आणले आहे.याची मांडणी उपमंत्र्यांसमोर करण्यात आली. यावर शासनाच्या सध्याच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्राधान्याने व नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळ आली तर या महिलांसाठी स्वतंत्र योजना तयार करून मंत्रिमंडळापुढे मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आपले मत व्यक्त करतांना खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की,’एकल महिलांच्या मालमत्तेच्या हक्काला संरक्षण गरजेचे प्रतिकूल परिस्थितीत सापडलेल्या या एकल महिलांच्या हतबलतेचा किंवा अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांना मालमत्तेच्या हक्कातून बेदखल करण्याचे प्रकार सुरू आहेत. यास प्रतिबंध घालण्यासाठी शासकीय यंत्रणेने त्यांच्या या हक्काचे संरक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.’
दरम्यान, मंत्रालयात झालेल्या या बैठकीत समितीचे निमंत्रक हेरंब कुलकर्णी, खासदार सुप्रिया सुळे, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास, महसूल व वने या विभागांचे प्रधान सचिव उपस्थित होते. समितीतर्फे जयाजी पाईकराव, प्रतिभा शिंदे, रेणुका कड आणि अल्लाउद्दीन शेख यांनी या महिलांचे प्रश्न शासनापुढे मांडले.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवार मोठे नेते नाहीत, शरद पवारांमुळे मिळालेल्या संधीची त्यांनी घाण केली-निलेश राणे
- राज्यकर्ते अराजकता माजवत आहेत आणि जनता असहाय्य आहे, न्याय कुणाकडे मागावा ?
- महंत नरेंद्र गिरी प्रकरणात मी दोषी असल्यास मला कायद्याप्रमाणे शिक्षा द्या – आनंद गिरी
- चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही; नाना पटोले यांचा घणाघात
- ‘राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत,आम्ही शिवसैनिकच आहोत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
