🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या आधीच विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. आज या अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालं.
परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई व इतर कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं, मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांना १ रुपयाही मिळाला नसल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला लक्ष्य केलं.
दरम्यान, त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. बच्चू कडू सद्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील काही शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीने दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनात गेले आहेत. तर, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
‘या महाविकास आघाडी सरकारचे मंत्री टू-व्हीलरने दिल्लीला जातात, पहिले महाराष्ट्रात तरी दिवे लावा. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला तरी न्याय द्या, खात्यात पैसे तरी टाका’ असा घणाघात रवी राणा यांनी केला असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी निलंबन झालं तरी चालेल अशी भूमिका घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांवर इंग्रजांपेक्षा जास्त दडपशाही करून थट्टा केलीये – रवी राणा
- विरोधी पक्षांची टीका म्हणजे ‘उचलली जीभ लावली टाळ्याला!: अशोक चव्हाण
- ग्रामपंचायत निवणुकांसाठी राज ठाकरेंनी ठोकला शड्डू !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
