Share

युट्युबसह जीमेल डाऊन; अवघ्या काही वेळात मिम्सचा धुमाकूळ

Published On: 

मुंबई : आजच्या डिजिट काळात एखादी दैनंदिन वापरातील वेबसाईट डाऊन झाली तरी आपली चलबिचल चालू होते. काही वेळापूर्वी तर आपला अविभाज्य भाग बनलेल्या जी-मेल आणि युट्युब डाऊन झाल्याचं अनुभवायला मिळत आहे. करोडो लोक ज्यावर अवलंबून असतात अशा या दोन गोष्टी एकावेळी बंद पडल्यामुळे जो तो विवंचनेत पडला आहे. युट्युब मनोरंजनासह अभ्यास व इतर कामांशी संबंधित व्हिडीओ साठी पाहिलं जातं तर जीमेल हे मेल्स, अधिकृत नोकरी, व्यवसाय संबंधित कामांसाठी वापरलं जातं.

सुरुवातीला स्वतःच्या बाबतीतच असं झाली की काय असं अनेकांना वाटलं. मग नेट बंद करून चालू केलं, ऍप-वेबसाईट बंद करून चालू केली. मात्र ‘समथिंग वेन्ट रॉंग’ काय राईट झालं नाही. मग अनेकांनी ट्विटरचा आधार घेतला आणि आपली व्यथा टाकली. दुसरीकडं मिम्स मात्र प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेकांना तर या मिम्समुळे समजलं कि असं काही झालं आहे.

आता बघता बघता युट्युब डाऊन (#YouTubeDown) असा हॅशटॅग ट्रेंडिंगला आला आहे. यानंतर चक्क जीमेल देखील बंद पडलं आणि ट्रेंडिंग आलं थेट गुगल डाऊन. गुगल सर्च इंजिन व्यवस्थित असून फक्त जीमेल व युट्युब बंद पडले आहेत. त्यामुळे तुम्हीही अशा परिस्थितीला सामोरे जात असाल तर घाबरू नका. ही समस्या सर्वांनाच आली असून गुगलने अद्याप या टेक्निकल एरर बद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. आता कितीवेळात या सुविधा पूर्ववत होतील याबाबत काही माहिती गुगलने अद्याप स्पष्ट केलेली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!