🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर अनेक खेळाडू मायदेशी परतले. यादरम्यान आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सदस्य पॅट कमिन्सने एक मुलाखत दिली . मात्र मुलाखत झाल्यानंतर पॅट कमिन्सकडून एक छोटीशी चुक घडली.
आयपीएल स्थगीत झाल्यानंतर पॅट कमिन्सने मंयती लँगर या लोकप्रिय क्रिडा प्रतिनीधीला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यात कमीन्सने त्याच्या कारकिर्दीतील अनेक आठवणी पॅटने यावेळी शेअर केल्या. ही मुलाखत संपल्यानंतर या मुलाखतीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना पॅटने ‘मंयती’ च्या जागी चुकून ‘मंयक’ टाईप झाले आणि मयंती लँगरच्या जागी भारतीय क्रिकेटपटु मंयक अग्रवालला टॅग झाले.
@patcummins30 You got the wrong person Pat ????
— Mayank Agarwal (@mayankcricket) May 9, 2021
पॅट कमिन्सकडून झालेली चुक मंयक अग्रवालच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्या ट्विटला प्रतिक्रिया देत ‘ पॅट तु चुकीच्या व्यक्तिला टॅग केले आहेस’ असे लिहीले. मंयक अग्रवालच्या या ट्विटला मयंती लँगरने कमेंट करत हसताना स्माईली टाकत इपीक हा हॅशटॅग लिहीला आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान पॅटने भारतातील कोरोनाग्रस्तासाठी ३७ लाख रुपयांची मदत केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘देवियो-सज्जनो, हो जाइए तैयार’ ; केबीसीसाठी आज रात्रीपासून नोंदणी सुरू
- लता मंगेशकर यांनी जम्बाे कोविड रुग्णालयाच्या कामाचे पत्र लिहीत केले कौतुक
- जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- रुग्णसेवेत कसलीही तडजोड नको; आरोग्य सेवा दर्जेदार असावी, राजेश टोपेंचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
