Share

…पण तुम्ही सरकारचे बाप निघालात- गोपीचंद पडळकर

Published On: 

मुंबई : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलत असतांना पडळकर म्हणाले की, ‘एसटी कर्मचाऱ्यांनी ताकदीने या आंदोलनात भाग घेतल्यामुळे आज सरकारच्या नाकीनऊ आलाय. सरकारला काही सुचेना. त्यांना काय करावं कळेना. काल तर त्यांनी हे आंदोलन नेतृत्वहीन झालंय असं म्हणत आम्ही बोलायचं कुणाशी असं विचारलं. अरे बोलायचं कुणाबरोबर इथं तुमचे हजारो बाप आणि आया बसलेत त्यांच्याशी येऊन बोला ना. मी आझाद मैदानावर बोलत असताना माझा आवाज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जात असेल आणि त्यांना ऐकू येत असेल तर तो आवाज या महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा आहे.’

दरम्यान,’तुम्हाला काही बोलायचं असेल तर ते एसटी कर्मचाऱ्यांशी बोला. मागणी एकच आहे, ती म्हणजे विलिनीकरणाची, दुसरी तिसरी चौथी पाचवी काही नाही. सरकार दररोज चॅनलच्या माध्यमातून नवीननवीन काही तरी सांगतंय. पण तुम्ही सरकारचे बाप निघालात, एसटी कर्मचारी डगमगायला तयार नाहीत.’ तसेच आतापर्यंत ड्रायव्हर आणि कंडक्टर भित्रा होता. काही नोटीस आली की तो एसटीत जाऊन बसायचा. ती एसटी कितीही वाजूदे, त्यात ऑईल असू दे नसू दे यांची गाडी सुसाट चालू व्हायची. आता चालक, वाहक घाबरायला तयार नाही. तुम्ही काहीही करा, आम्हाला विलिनीकरण पाहिजे या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम राहिले, असेही पडळकरांनी यावेळी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!