मुंबई : ऐन दिवाळीत राज्यात एसटी कर्मचारी आंदोलन सुरु केलं ते अद्यापही सुरुच आहे. भाजपने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar), भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मागील 11 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. मात्र, सरकारकडून अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीकडे लक्ष दिलं जात नाही. यावर गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाची आजची दिशा जाहीर केली आहे.
सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन नेतृत्वहीन झाले आहे, आम्ही बोलायचं कोणाशी. अरे इथं तुमचे हजारो बाप आणि आया बसल्या आहेत, त्यांच्याशी येऊन बोला ना’, असा घणाघात पडळकर यांनी केला आहे. आंदोलकांशी चर्चा करायची सोडून राज्य सरकार चॅनलच्या माध्यमातून दररोज नवनवीन गोष्टी सांगत आहे, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.
एसटी कर्मचारी पैसे आणून देतात, तेच पैसे भ्रष्टाचारात जातात. आम्ही तुम्हाला फक्त विलिनीकरण करा असं म्हणत नाही. तर पर्यायही देत आहोत. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला पर्याय दिला आणि जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं तेच एसटी कर्मचाऱ्यांना कसं मिळू शकतं हे सांगितलं, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
एसटीच्या महिला कर्मचारी दुपारी चार वाजता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या बंगल्यावर जात परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार असल्याचं गोपीचंद पडळकरांनी सांगितलं आहे. आम्ही फक्त बोलत नाही. राज्य सरकारच्या तिजोरीतून या कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या 7 तारखेला झाले पाहिजेत. एक दिवसही पुढे गेला नाही पाहिजे. तुम्ही आम्हाला राज्य सरकारमध्ये घेऊ शकता. हे एसटी कर्मचारी पैसे आणून देतात. तेच पैसे भ्रष्टाचारात जातात. तो भ्रष्टाचार थांबवला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर महामंडळांपेक्षा दुप्पट होऊ शकतो’, असा दावा करत गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- रामदास कदमांचा पत्ता कट; शिवसेनेकडून ‘या’ २ नेत्यांना मिळाली विधान परिषदेची उमेदवारी
- ‘शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढून मिळवलं, भिकेत मिळालं नाही’
- महाविकास आघाडीचे फसवे आकडे, भाजपचाच…; चंद्रकांत पाटलांचा दावा
- …म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते- संजय राऊत
- ‘त्या’ सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं- सचिन सावंत


