Share

प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य; वानखेडे धर्मामुळे अडचणीत येणार नाहीत, कारण….

Published On: 

मुंबई: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) ड्रग्स प्रकरणापासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या हात धुवून मागे लागले असल्याचे दिसत आहे. सातत्याने पत्रकार परिषद घेऊन ते नवनवीन आरोप समीर वानखेडे यांच्यावर करत आहेत. मागे समीर वानखेडे हे हिंदू नसल्याचा दावा त्यांनी केला होता त्याच सोबत शुक्रवारी वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांच्या नावावर दारूचा परवाना असल्याचा आरोप केला आहे.

समीर वानखेडे यांनी नौकरी मिळवण्यासाठी खोटे जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता, मात्र हे सर्व आरोप समीर वानखेडे व त्याच्या घरच्यांनी फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील आता समीर वानखेडे यांच्या प्रकरणी वक्तव्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, वडिलांनी मुस्लीम धर्म स्विकारला असला तरी, मी वयात आल्यानंतर तो स्वीकारलेला नाही हे जे वानखेडेंचं म्हणनं आहे, ते बरोबर आहे. १८ वर्षाचा होईपर्यंत कुठलाही मुलगा आपल्या आई वडिलांच्या ताब्यात असतो, ते त्याचे गार्डीयन असतात. त्यामुळे त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट मुलाला लागू होत नाही असंही त्यांनी पुढे सांगितलं. पुढे ते म्हणाले की, त्यांना या प्रकरणात कोणतीही अडचण येईल असं आपल्याला वाटत नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!