Share

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, ‘या’ तारखेला सुरु होणार शाळा

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून आता ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु होणार आहेत. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देत निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की,’एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या ४ तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. आणि मला वाटतं बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगलं आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ हा निर्णय आत्ताच झाला आहे. त्यामुळे कोणत्या वर्गापासून शाळा सुरु होणार हे निश्चित सांगता येणार नाही. सोशल मीडियावर अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळा सुरु करण्या संदर्भात मागणी केली होती.या सर्व गोष्टींचा विचार करूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनाच्या काळात जशी आपण काळजी घेतली होती, त्याच धर्तीवर शाळा सुरु करण्यासंदर्भात काळजी घेतली जाईल. कुठे रुग्णसंख्या वाढलीच तर आपण लगेच तपासणी करुन घेऊ,’ असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!