मुंबई : भाजप नेते निलेश राणे यांनी आज(१६ डिसें.)पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने ॲार्डरमध्ये राज्य सरकारला फटकारले आहे,असेही ते म्हणाले आहे.
यासंदर्भात निलेश राणे(Nilesh Rane) यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर कॉपी शेअर केली आहे. तसेच ते म्हणाले आहेत की,’कोर्टानं ॲार्डरमध्ये राज्य सरकारला फटकारले…२९ जून पासून राज्य सरकारने आरक्षणात कोणतीही प्रगती केली नाही. आयोग स्थापन केला पण प्रक्रिया पूर्ण केली नाही, आयोग अजूनही प्रतिक्षेत आहे.’
सुप्रीम कोर्ट ॲार्डर कॉपी,
कोर्टानं ॲार्डरमध्ये राज्य सरकारला फटकारले..
२९ जून पासून राज्य सरकारने आरक्षणात कोणतीही प्रगती केली नाही. आयोग स्थापन केला पण प्रक्रिया पूर्ण केली नाही, आयोग अजूनही प्रतिक्षेत आहे. pic.twitter.com/iGbduHrbJ9
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 16, 2021
दरम्यान, राणेंनी शेअर केलेल्या सुप्रीम कोर्टाच्या कॉपीमध्ये म्हंटले आहे की,’खरंच, त्या निकालानंतर, राज्य सरकारने २६ जून २०२१ रोजी एक आयोग नेमला. परंतु, त्या संदर्भात कोणतीही प्रगती झालेली नाही. या प्रकरणी राज्याला योग्य निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी आयोगाचा अभिप्राय अद्याप प्रलंबित आहे. महाराष्ट्र राज्याने त्याऐवजी ओबीसींसाठी २७ टक्के पर्यंत आरक्षणाची तरतूद असलेल्या संबंधित तरतुदीत सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी करण्याचा मार्ग अवलंबला आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘आपल्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार…’, अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आनंद
- धक्कादायक! सोनू सूदनं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केलेल्या महिला नेमबाज खेळाडूची आत्महत्या
- राजकीय बॅनरबाजीतून औरंगाबादचे विद्रुपीकरण; औरंगाबाद मनपाची थातूरमातूर कारवाई..!
- डेटा करण्यासाठी लागणारा निधी त्वरित देणार- अजित पवार
- बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले यश


