Share

‘भाजपला निराशेने ग्रासले आहे, शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय त्यांना दिसत नाही’

Published On: 

वर्धा : विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमस्थळी फडणवीस-राऊत यांची गळाभेटही झाली होती. त्यानंतर आणखी एक राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारी घटना घडली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर हे दोन्ही नेते भेटले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराचकाळ चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

‘भेटीत माझ्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळाबाबतही आमच्यात बोलणी झाली, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. ‘आजच्या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांनी ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी भेटीबाबत वक्तव्य केले असल्याने भेटीबाबत संभ्रम वाढला होता.

दरम्यान, या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर मौन सोडण्यात आले आहे. ‘भाजपला शिवसेनेशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच भविष्यात कधीतरी शिवसेना पुन्हा आपल्यासोबत येईल’, अशी आशा भाजपच्या मनात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. भाजप जाणुनबुजून स्वत:च्या सोयीची वातावरणनिर्मिती करू पाहत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

‘भाजपला निराशेने ग्रासले आहे. शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय त्यांना दिसत नाही. त्यामुळे स्वत:च्या मतदारसंघाच्या कामाचे कारण पुढे करून भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. या भेटीतून वेगळे अर्थ काढून चर्चा घडवून आणायची आणि त्या माध्यमातून होणाऱ्या राजकीय वातावरणनिर्मितीचा फायदा उठवायचा, हा भाजपचा डाव आहे’ असा घणाघात पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!