Share

कोहलीने लीड्स कसोटीतील पराभवाचे खापर फलंदाजीवर फोडले, म्हणाला..

Published On: 

मुंबई : लॉर्ड्स कसोटीतील दैदीप्यमान विजयानंतर लीड्स कसोटीत भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ३५४ धावांच्या आघाडीसमोर टीम इंडियाचा दुसरा डाव २७८ धावांवर अटोपला. यासह इंग्लंडने भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका १-१ अशी बरोबरी केली आहे.

इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पराभवाचे खापर फलंदाजीवर फोडले. सामना संपल्यानंतर बोलताना तो म्हणाला, ‘खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम होती त्यामुळे खेळपट्टीला दोष देण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजानी अचुक गोलंदाजी करत आम्हाला चुक करण्यास भाग पाडले. त्यामुळे आम्हाला धावा करणे कठीण झाले होते. तसेच आम्ही काही वाईट निर्णय देखील घेतले त्याचा परिणाम इंग्लंडच्या तुलनेत आमचे फलंदाज अपयशी ठरले.’ असे तो म्हणाला.

यावेळी बोलताना पुढे कोहली म्हणाला,’आमच्या वरच्या क्रमांकातील फलंदाजानी अधीक धावा करणे गरजेचे आहे. जेणेकरुन मधल्या फळीवर धावा करण्याचा दबाव येणार नाही. प्रत्येक वेळी खालच्या फलंदाजावर अवलंबून राहणे शक्य नाही.’ असे कोहली म्हणाला. यावेळी त्याने मालिकेतील पुढील कसोटी सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्याचा मानस बोलुन दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!