Share

सूर्याला संधी देण्याची हीच वेळ : दिलीप वेंगसरकर

Published On: 

 इंग्लंड : लॉर्ड्स कसोटीतील दैदीप्यमान विजयानंतर लीड्स कसोटीत भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ३५४ धावांच्या आघाडीसमोर टीम इंडियाचा दुसरा डाव २७८ धावांवर अटोपला. यासह इंग्लंडने भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका १-१ अशी बरोबरी केली आहे.

टीम इंडियाच्या पराभवाच खापर अनेकांनी फलंदाजांनवर फोडले आहे. भारतीय फलंदाजांना मागील काही काळात मोठी खेळी करण्यात सातत्याने अपयश आलं आहे. त्यातच कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनाही धावा करण्यात सातत्याने अपयश आलं आहे. त्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी अतिरिक्त फलंदाजाची संघात निवड करण्याची गरज असून मुंबईकर सूर्यकुमार यादवला संधी दयावी असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच यावेळी त्यांनी विराट कोहलीला देखील सल्ला दिला आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय संघाने फलंदाजांची फळी अधिक मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी हनुमा विहारीच्या आधी सूर्यकुमार यादवला संधी दिली पाहिजे. भारताने एका गोलंदाजाला वगळून सहा प्रमुख फलंदाजांसह खेळले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

सूर्यकुमारने मागील काही वर्षांत एकदिवसीय आणि विशेषतः टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्येही यशस्वी ठरू शकेल असा विश्वासही यावेळी त्यांनी दाखवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!