मुंबई : लॉर्ड्स कसोटीतील दैदीप्यमान विजयानंतर लीड्स कसोटीत भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ३५४ धावांच्या आघाडीसमोर टीम इंडियाचा दुसरा डाव २७८ धावांवर अटोपला. यासह इंग्लंडने भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका १-१ अशी बरोबरी केली आहे.
लीड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी सकाळी चेतेश्वर पुजारा ९१ धावांवर असताना मैदानावर खेळण्यासाठी उतरला. मात्र एकही धावेची भर न घालता तो बाद झाला. नर्व्हस नाईन्टी मध्ये बाद होण्याची पुजाराची ही सहावी वेळ होती. यासह त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू द वॉल राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला आहे. राहुल द्रविड त्याच्या कारकिर्दीत पाच वेळेस नर्व्हस नाईन्टी मध्ये बाद झाला आहे.
लीड्स कसोटीचा तिसरा दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा ९१ धावांवर नाबाद होता. चौथ्या दिवशी त्याच्या शतकाची अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने तो इंग्लंडचा गोलंदाज ओली रॉबीन्सनचा बळी ठरला. बाहेर जाणाऱ्या चेंडुला सोडला मात्र हा चेंडु पॅडवर जाऊन लागला. रॉबीन्सनने पायचीताचे अपिल केले होते. पण मैदानावरील पंचानी पुजाराला नाबाद ठरवले. यानंतर इंग्लंडने डीआरएस घेतला असता पुजारा बाद झाल्याचे स्पष्ट झाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मैदानात घुसलेल्या ‘त्या’ व्यक्तीवर आजीवन बंदी; इंग्लिश काउंटी यॉर्कशायरने केली मोठी कारवाई
- लीड्स कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, जडेजाला झाली मोठी दुखापत
- देशात महाराष्ट्र अग्रेसर ; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या गेली दीड कोटीवर
- ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांवर विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले..
- ..तर पोलिसांनी भाजपा नेत्यांचे मुसक्या आवळाव्यात, कुठलीही दया दाखवू नये-सचिन सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

