Share

“छत्रपती संभाजी मातोश्रीवर गेले नाहीत म्हणून…”, निलेश राणेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना अगोदर शिवसेना प्रवेश तरच राज्यसभेची संधी अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र संभाजीराजेंनी ही ऑफर नाकारली होती. आता राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांचे  नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“राज्यसभेच्या ६व्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी दिली. छत्रपती संभाजी मातोश्रीवर गेले नाहीत म्हणून त्यांना उमेदवारी नाही, हा राजघराण्याचा अपमान आहेच पण शिवसेना किती खालच्या थराला जाऊन घाणेरडे राजकारण करणारा पक्ष आहे हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान संजय पवार यांचे  नाव फायनल आहे. संजय पवार हा सेनेचा मावळा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असून अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. मात्र संभाजीराजे यांना समर्थन न दिल्याने आता शिवसेनेवर टीका केली जात असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!