मुंबई: पंजाब किंग्जने या हंगामात खेळल्या गेलेल्या ४ सामन्यात २ विजय आणि दोन पराभव मिळवले आहे. तर यात मयंक अग्रवालची फलंदाजीही खराब राहिली आहे. ज्यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने त्याला मोठा सल्ला दिला आहे. मयंक अग्रवालने केवळ एका सामन्यात ३२ धावा केल्या. यानंतर तो पहिल्या आणि दुसऱ्या षटकात वारंवार विकेट फेकत आहे. अशा परिस्थितीत वीरेंद्र सेहवागने त्याला विशेष सल्ला दिला आहे.
सेहवागचे म्हणणे आहे की पंजाब किंग्जच्या (PBKS) कर्णधारपदाचा मयंकच्या फलंदाजीवर दबाव दिसून येत आहे. याबद्दल बोलताना वीरेंद्र सेहवाग (Virendra sehwag) म्हणाला, ‘तो संघाचा कर्णधार कसा आहे हे महत्त्वाचे नाही, त्याच्याकडे खरोखर चांगली गोलंदाजी आहे जी पंजाबच्या खेळावर नियंत्रण ठेवू शकते. कर्णधार झाल्यापासून मयंकच्या (mayank agrawal) फलंदाजीवर परिणाम झाला आहे.त्याने ३ डावात ओपनिंग करताना केवळ ३७ धावा केल्या आहेत.’
वीरेंद्र सेहवागनेही मयंक अग्रवालला एक खास सल्ला दिला आहे. “गेल्या वर्षापर्यंत त्याच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर तो सतत धावा करत होता. त्याने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि सध्या तो कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत आहे हे विसरले पाहिजे. त्याने कोणत्याही दबावाशिवाय मुक्तपणे फलंदाजी करायला हवी.”
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- मुस्लिम समाजाच्या मोर्चामुळे वसंत मोरेंना प्रचंड वेदना
- “…तर त्यांनी मुंबईच्या सीपींना त्वरित राजीनामा देण्यास सांगावे”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नितेश राणेंची मागणी
- IPL 2022: सर जडेजाची चेन्नई सुपर किंग्ज कुल विल्यमसनच्या हैदराबादला भिडणार; जाणून घ्या कोणाचे असेल वर्चस्व
- “सरकारने एसटी कामगारांबद्दल सहानुभूती दाखवावी सुडाची कारवाई…”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया
- “निवडणूक राजकीय शर्यत असली तरी त्यात खिलाडूवृत्ती असावी दुर्दैवाने भाजप…”, अशोक चव्हाण यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

