Share

“राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्यांकडूनच हल्ल्याचं समर्थन” – संजय राऊत

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. संजय राऊत म्हणाले, पवारांच्या घरासमोर घडलेला प्रसंग हे आंदोलन नव्हते, हा हल्ला होता. या हल्ल्याचे समर्थन विरोधी पक्षातील लोक करत होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेतेच समर्थन करते होते. असा थेट आरोप राऊतांनी केला आहे.

तसेच संजय राऊत म्हणाले, एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचं पाठबळ आहे. तो कुणाच्या घरात राहतो, कुणाकडून त्याला आर्थिक पाठबळ दिले जाते हे समोर येत आहे. कालचा हल्ला हा त्यातलाच भाग होता. असा दावा थेट संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांनी आज पवारांची घरी जाऊन भेट घेतल्यानंतर भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

काल ज्या भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या ते कालपर्यंत राष्ट्रवादीत होते. ते भाजपमध्ये गेले, पवारांविरोधात बोलत होते. हल्ल्याचं समर्थन करत होते. हा हलकटपणा आहे. पवारांनी मोठ केलं, तुम्ही काय मुळचे भाजपवाले आहात काय? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

IPL 2022: पंजाबच्या पराभवानंतर सेहवागचा मयंकला खास सल्ला; म्हणाला ‘तू कॅप्टन आहेस हे विसरून जा…’
मुस्लिम समाजाच्या मोर्चामुळे वसंत मोरेंना प्रचंड वेदना
“…तर त्यांनी मुंबईच्या सीपींना त्वरित राजीनामा देण्यास सांगावे”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नितेश राणेंची मागणी
IPL 2022: सर जडेजाची चेन्नई सुपर किंग्ज कुल विल्यमसनच्या हैदराबादला भिडणार; जाणून घ्या कोणाचे असेल वर्चस्व
“सरकारने एसटी कामगारांबद्दल सहानुभूती दाखवावी सुडाची कारवाई…”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!