मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिंदे गटात ४९ आमदार आहेत. त्यामुळे राज्यात असलेलेल सध्याचे महाविकास आघाडी सरकार आल्पमतात आहे. काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान राज्यपालांनी 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावले असून महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यपालांनी बोलावलेले विशेष अधिवेशनाचे हे सत्र असंवैधानिक असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई प्रलंबित होत असताना दुसरीकडे अशा प्रकारचे आदेश देणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून राज्यघटनेच्या चिंधड्या उडवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्या सुप्रीम कोर्टात असताना दुसरीकडे बहुमत चाचणीचे आदेश देणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवसेना या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाकडून आशा असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपालांनी दोन वर्ष १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यानंतर आता एकाच दिवसात सरकारला बहुमत चाचणीचे आदेश देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी दिलेले आदेश हे बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले. बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलू नये अशी मागणी केली आहे. त्यांच्या बोलण्यामुळे सरकार संकटात आल्याचा दावा त्यांनी केला. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, मी पक्षाची भूमिका मांडत असतो. पक्षानेच ही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे काहींना आक्षेप असल्यास मी माध्यमांशी बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले. संविधान देशाची घटना आहे , या संविधानाचे रखवालदारचं असं वागत असतील घटनेचा हा अपमान आहे. त्यांचा स्वप्नपुर्ती क्षण जवळ आलेला असेल आणि त्यासाठी या घडामोडी घडवत असतील तर मी शुभेच्छा देतो असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde : आसाम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी बंडखोर आमदार देणार ५१ लाख रुपयांची मदत
- IND vs IRE : ‘हा’ वेगवान गोलंदाज आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यात ‘झिरो’वरून झाला ‘हिरो’, वाचा!
- IND vs IRE : जोडी जबरदस्त..! हुडा-सॅमसननं रचला नवा इतिहास; रोहित-राहुलला टाकलं मागे!
- Gulabrao Patil : “संजय राऊतांना ३०२, तडीपार माहित नाही, हे बाळासाहेबांचा फोटो…” ; गुलाबराव पाटलांची टीका
- Ananya : “‘इच्छा, धैर्य, शौर्य…” ; अनन्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रतिकने केले हृताचे कौतुक


