सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी काल कोकण दौऱ्यावर आले होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते हे देखील कोकणामधील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून आढावा घेत आहेत.
कोकणाला मदत देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केवळ तीन तासातच आपला दौरा आटोपता घेतल्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
मुख्यमंत्र्याच्या कोकण दौऱ्यावर ६० ते ७० लाख रुपये खर्च झाले, खाजगी विमानाचा व इतर खर्च मिळून. फक्त ३ तासांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःवर एवढे पैसे उडवले पण ज्या भागाची पाहणी करायला आले तिथे ७ रुपये सुद्धा दिले नाहीत. चिपी विमानतलाळा DGCA ची परवानगी नसताना स्वतःचं विमान उतरवलं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 22, 2021
‘मुख्यमंत्र्याच्या कोकण दौऱ्यावर ६० ते ७० लाख रुपये खर्च झाले, खाजगी विमानाचा व इतर खर्च मिळून. फक्त ३ तासांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःवर एवढे पैसे उडवले पण ज्या भागाची पाहणी करायला आले तिथे ७ रुपये सुद्धा दिले नाहीत. चिपी विमानतलाळा DGCA ची परवानगी नसताना स्वतःचं विमान उतरवलं,’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय होणार ? केंद्र सरकारची महत्वाची बैठक
- ‘…तर १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो
- शरद पवारांसह रोहित पवारांवर टीका केल्याच्या आरोपाखाली भाजप युवा मोर्चाच्या गावडेंना अटक !
- ‘एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केलं, पण उद्धव ठाकरे मात्र कपड्याची इस्त्रीही मोडू न देता मुंबईत परतले’
- औरंगाबादेत तरुण वर्गच सुपर स्प्रेडर, बाधितांमध्ये ‘एवढ्या’ तरुणांचा समावेश!


