नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. शनिवारी देशभरात ९३ हजार २४९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी यावर्षातील एकाच दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधित रु्ग्णांची संख्या १ कोटी २४ लाख ८५ हजार ५०९ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १८ सप्टेंबरपासून कोरोनाबाधित रुग्णांची ही सर्वाधिक नोंद आहे. १८ सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित ९३ हजार ३३७ रुग्णांची नोंद झाली होती.
देशभरात ही परिस्थिती आणखी भयावह होण्याचा अंदाज बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं व्यक्त केला आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा आकडा 1.4 कोटीच्याही पुढे जाईल. कोरोनाच्या ट्रेंडवर नजर ठेवणाऱ्या शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिलच्या मध्यापर्यंत कोरोना आपल्या पिकवर असू शकतो आणि अॅक्टिव्ह केस 7.3 लाखापर्यंत जाऊ शकतात.
एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं होईल. मेअखेरपर्यंत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 लाखाहून अधिक होईल. असे शोधकर्त्यांचे म्हणणे आहे. शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, जर आतापासून लोकांनी कोरोना नियमांचं पालन केलं, मास्क लावलं सोशल डिस्टन्सिंगचे पालन केलं आणि लसीकऱणाची संख्या वाढवल्यास कोरोनाची वाढती संख्या आटोक्यात आणणं शक्य होईल.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रोफेसर शशिकुमार यांनी सांगितलं, की आतापर्यंत आम्ही जो अंदाज लावला आहे, तो कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या ट्रेंडवर आधारित आहे. आमच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरपर्यंतच रुग्णांची संख्या 10.7 लाखापर्यंत पोहोचेल.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; आणखी कडक निर्बंध लागणार?
- प्रधानमंत्री आवास योजना; हिंगोली मराठवाड्यात अव्वल!
- Breaking : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता तातडीची बैठक
- आरसीबीने संघातून काढल्यानंतर KKR ने दिली जर्सी ; ‘हा’ खेळाडू KKR मध्ये सामील
- चिंताजनक! उदगिरात २ दिवसात १८८ जण कोरोना पॉझिटिव्ह


