Share

‘ह्या भिकार माणसाला खासदार कोणी केला? तपास संस्था आणि आर्मी यांचं काम काय हे कळत नाही’

Published On: 

सिंधुदुर्ग : नव्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. देशाच्या विविध भागातून शेतकऱ्यांनी त्याविरोधात आंदोलने केली आहेत. त्यावरच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

लडाख आणि काश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती.

या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ह्या भिकार माणसाला खासदार कोणी केला?? कुठला संबंध कुठे जोडायचा काही अक्कल आहे की नाही. Investigative agencies चं काम काय आणि army चं काय हे ज्या खासदाराला कळत नाही त्याला देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहात जायचा अधिकारचं नाही.’ अशी जळजळीत टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

ईडी, सीबीआय आदी तपास संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी – संजय राऊत

हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही. असा टोला शिवसेनेने सामना संपादकीयमधून लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!