सिंधुदुर्ग : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोलीतील सभेत भाजप नेते नारायण राणे व त्यांचे पुत्र निलेश राणे यांच्यावर जहरी टीका केली होती. शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यापासून राणे अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर त्यांनी घणाघात सुरूच ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्तार यांनी, ‘निलेश राणे चार आणे, त्याचा बाप किती आणे हे मला माहित नाही’ अशा जहाल शब्दांत टीका केली होती.
यावर निलेश राणे यांनी पलटवार केला असून आक्षेपार्ह शब्दांत त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘डुक्कर सत्तार अब्दुल, कॅबिनेट मंत्रिपदासाठी काँग्रेसमधून झाला गुल, शिवसेनेने राज्यमंत्री देऊन केला एप्रिल फुल. अब्दुल तुझी लायकी किती आणि तू बोलतो किती. राणे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी नाही. तुझ्यासारखे आमची गाडी धुतात. अवकादित रहा.’ असा इशारा निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.
डुक्कर सत्तार अब्दुल,
कॅबिनेट मंत्रिपदासाठी काँग्रेसमधून झाला गुल,
शिवसेनेने राज्यमंत्री देऊन केला एप्रिल फुल.
अब्दुल तुझी लायकी किती आणि तू बोलतो किती. राणे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी नाही. तुझ्यासारखे आमची गाडी धुतात. अवकादित रहा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 29, 2020
महत्वाच्या बातम्या
- उदयनराजेंचे ‘ते’ वक्तव्य धक्कादायक आणि आक्षेपार्ह आहे : सचिन सावंत
- मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार
- दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो – राज्यपाल
- भारताने मालिका गमावली पण या पट्ठ्यानं मनं जिंकली!
- ‘अब होगी किसान कि बात’ : राहुल गांधी


