🕒 1 min read
अहमदनगर : राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत तर कुठे ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर सारखी इंजेक्शन्स मिळत नसल्याचे चित्र आहे. अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे अनेकांचा प्राणास मुकावे लागत आहे.
अशातच, पहिल्या लाटेत नागरिकांची प्रचंड हेळसांड झाल्यानंतर या लाटेत काही लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आक्रोशातुन बोध घेऊन रुग्णांच्या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, मागील लाटेसह या लाटेत देखील रुग्णांसाठी सक्रिय काम करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
‘माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत,’ असा निर्धारच निलेश लंके यांनी केला आहे. निलेश लंके यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले होते. यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला होता. तर, या लाटेत देखील त्यांनी आणखी एक कोविड सेंटर उभारलं असून या सेंटर्सच्या कारभारावर लंके स्वतः लक्ष ठेवून आहेत.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींसह सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह जाहिरात; काँग्रेसचं कंपनीविरोधात खळ्ळ-खट्याक !
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
- राज्यभर आरोग्य सुविधांचा बोजवारा, आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
