मुंबई : महाराष्ट्राला ऐतिहासिक, कलेचा आणि कर्तृत्वाने नाव जगाच्या पाठीवर गाजवणाऱ्या व्यक्तींचा परिसस्पर्श लाभला आहे. अशाच उज्वल भविष्य असलेल्या नव्या पिढीच्या साहसाचे आणि कर्तृत्वाचे वारंवार अनेक दाखले मिळत असतात. आता नील शेकटकर या ११ वर्षीय मुलाचे सारे कौतुक करत आहेत.
एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १५ किलोमीटरचे अंतर अकरा वर्षाच्या नील सचिन शेकटकर याने अवघ्या दोन तास पंचेचाळीस मिनिटात पोहून पार केले. त्यांच्या या जलतरण विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. नील शेकटकरच्या या साहसी जलतरण कामगिरीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्याचा सत्कार करुन कौतुक केले.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात नील शेकटकरचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीलच्या जलतरण कामगिरीचे कौतुक केले. तज्ज्ञ प्रशिक्षकाकडे पुढील प्रशिक्षण घेऊन जलतरण क्षेत्रात आणखी दमदार कामगिरी करत व्यावसायिक स्पर्धेत भाग घेत राज्याचे, देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला केले. नीलसह त्याच्या प्रशिक्षक, पालकांचेही अभिनंदन करत उपमुख्यमंत्र्यांनी त्याला जलतरण क्षेत्रात उज्ज्वल कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हरवलेल्या बालकांचा पोलिस घेणार शोध, पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांचे आदेश
- ‘नुसती स्तुती करू नका, नितीन गडकरींसारखं काम करून दाखवा’; फडणवीसांच चव्हाणांना ‘चॅलेंज’
- अजब ! 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावला लागल्या गाणी गायला, कामकाजात आणले व्यत्यय
- एकच धून…६ जून ! शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य होण्यासाठी संभाजीराजेंनी जाहीर केली लिंक
- ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ तीन मोठे निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

