परभणी : केंद्रातल्या मोदी सरकारची गेल्या सात वर्षांमधली कामगिरी फारशी उल्लेखनीय नसली तरीही केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं काम हे चांगलं झालं आहे. नितीन गडकरींचा उल्लेख चुकीच्या पक्षातला चांगला माणूस असं करावं लागेल असं विधान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं होतं.
यावर आज माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाणांना ‘कामाचा सल्ला’ दिला आहे. ‘आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याचं काम हे सगळ्या पक्षातील नेत्यांना आवडतंय हे उत्तम आहे. त्यामुळे माझा अशोकरावांना असा सल्ला आहे की, नुसती स्तुती करू नका तर गडकरींसारखं कामही करून दाखवा. तुम्ही काम केलं तर तुमचीही स्तुती होईल,’ असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं आहे.
काय म्हणाले होते अशोक चव्हाण ?
‘महाराष्ट्रातल्या महत्वाच्या आणि छोट्यातल्या छोट्या कामांबद्दल गडकरी नेहमी चांगलं काम करतात. मी ट्विटरवरुन किंवा लेखात त्यांच्या कामाचं कौतुक नेहमीच करतो. पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या राजकीय भूमिकेचं समर्थन करतो. ते एका चुकीच्या पक्षातले चांगले माणूस आहेत असं म्हणत अशोक चव्हाणांनी गडकरींचं कौतुक करत नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. रस्ते आणि वाहतूक क्षेत्रातलं गडकरींचं काम कौतुकास्पद असून केंद्रात त्यांचे अधिकार काढून घेत कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो,’ असंही चव्हाण म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- सुखद! औरंगाबाद पालिकेतून रुग्णांना कॉल, तुमची तब्येत बरी आहे का?
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, शून्य पॉझिटिव्ह
- पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये; आरक्षण रद्द होण्यास पवारच जबाबदार – पडळकर
- ‘जनता ठरवेल शिवसेनेनं काम किती केलं आणि वसुली किती केली ते’
- आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांच्या खात्यात राज्य सरकार ५ लाख रुपये जमा करणार !


