🕒 1 min read
औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलनादरम्यान राष्ट्रीय ध्वजाचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येत रोष व्यक्त केला. शहरातील क्रांती चौकाजवळील स्वातंत्र्य संग्राम स्मारकाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजता शहरातील नागरिकांनी राष्ट्रगीत व प्रतिज्ञा म्हणत राष्ट्रध्वजाला वंदन केले.
राजधानी दिल्ली येथे काही समाजकंटकांनी राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केला व पोलिसांवर हल्ले करत थेट लाल किल्ल्यावर दुसरा ध्वज फडकावला, हे लाजिरवाणे दृश्य पाहून देशातील सामान्य जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
आपल्या देशाचा सन्मान आपला तिरंगा ध्वज असून त्याच्या रक्षणासाठी चिनी सीमेवर, पाकिस्तानी सीमेवर आपल्या पराक्रमी जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. आपले प्राण अर्पण करून त्यांनी संरक्षण केले. 26 जानेवारीला त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करून हा देश एकीकडे त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो आहे, तर दुसरीकडे त्याच तिरंग्याचा अपमान केला जातो आहे. या घटनेमुळे शहीद जवानांचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अवमान केला जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या उपक्रमासाठी शहरातील निखिल उऱ्हेकर, शैलेश पवार, राजेश पोतदार, रवी संघई, गणेश कुलकर्णी, विवेक बाप्ते, सागर शिंदे यांनी परिश्रम घेतले.
महत्वाच्या बातम्या
- आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही; फडणवीसांचं सूचक विधान
- ‘मुक्कद्दर’ चा सिकंदर स्वप्निल कोलते काळाच्या पडद्याआड !
- छत्रपती संभाजी महाराजांचे औरंगाबादसाठी योगदान काय? नामांतराच्या मुद्द्यावरून सपाचे वादग्रस्त वक्तव्य
- १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने जाणार थेट भंगारात; प्रदूषण रोखण्यासाठी नितीन गडकरींचं महत्वाचं पाऊल
- मुंबईला नाईट लाईफची गरज, त्यासाठी सुरक्षा पुरवू : अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

