Share

‘नाईट कर्फ्यू’चा सायना चित्रपटाच्या कमाईवर परिणाम! बिग बींचा ‘चेहरे’ लांबणीवर पडणार?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात दररोज कोरोना केसेस झपाट्याने वाढत आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सही गेल्या काही दिवसांत या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता काही निर्मात्यांनी आगामी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बंटी और बबली’, ‘डी कंपनी’, ‘हाथी मेरे साथी’ यासारख्या चित्रपटांचे प्रकाशन पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणाचा फटका शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या ‘सायना’ या चित्रपटावर दिसला आहे.

बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक ‘सायना’ शुक्रवारी रिलीज झाला आहे. पण कोव्हिडच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा प्रभाव त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला आहे. आता महाराष्ट्रातही 15 एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा चित्रपट ‘चेहरे’ देखील प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे सध्या हा चित्रपट पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीचा चित्रपट ‘चेहरे’ 9 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. पण आता निर्मात्यांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा विचार केला आहे. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माता आनंद पंडित म्हणाले की, ‘होळीनंतर आम्ही संबंधितांशी चर्चा करू आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत निर्णय घेऊ’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!