Share

‘या’ स्टार फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप झाल्याने क्रीडाजगतात खळबळ

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनिअरवर पॅरिसमध्ये एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये फुटबॉलपटू नेमार याने दारूच्या नशेत मारहाण करून बलात्कार केल्याचा आरोप एका महिलने केला आहे.

पीडित महिला ब्राझीलची आहे. सोशल मीडियावरून नेमार आणि या महिलेची ओळख झाली होती. सोशल मीडियावर चॅटिंग करताना नेमारनं पीडितेला पॅरिसला येऊन भेट असं सांगितलं. त्यानुसार ती पॅरिसला हॉटेलात थांबली. नेमार दारुच्या नशेत हॉटेलवर आला. त्या दोघांमध्ये गप्पा झाल्या. त्यानंतर नेमारनं मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे.

दरम्यान, बलात्काराचा आरोपात तथ्य नसल्याचे नेमारचे वडिल आणि मॅनेजरने सांगितले आहे. ब्लॅकमेल करुन पैसे उखळण्यासाठी हा आरोप केल्याचं नेमारच्या वडिलांचे म्हणणं आहे. साओ पाउलो पोलिसांत नेमारविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!