🕒 1 min read
औरंगाबाद : पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आदी) विद्यार्थ्यांची नोंदणी २२ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान पीएच. डीसाठी ऑनलाईन नोंदणी तर एप्रिल महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. ४५ विषयात ‘पेट‘ घेण्यात आली. पुढील आठवड्यामध्ये पेट बाबतच्या रिक्त जागा तसेच गाइडबाबत माहिती देण्यात येणार असल्याची माहिती उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली आहे.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या आदेशानुसार विषयनिहाय रिक्त जागा व गाईडची संख्याही २२ मार्चला प्रकाशित करण्यात येणार आहे. ‘पेट‘चा दुसरा टप्पा १३ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या टप्प्यात ‘पेट‘ उत्तीर्ण झालेले तसेच ‘पेट‘मधून सुट मिळालेले दुस-या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच ‘सीईटी‘ मार्फत प्रवेश घेऊन पदवी प्राप्त एम.फिल विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.
२२ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येईल. तर ८ एप्रिलपर्यंत विद्यापीठात ‘हार्ड कॉपी‘ जमा करता येईल. तसेच एप्रिल महिन्यात संशोधन व अधिमान्यता समितीच्या आरआरसी बैठक होणार आहे, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव यांनी माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना वाढतोय पण निर्लज्जपणे थुंकणाऱ्यांना आवर घालणार कोण ?
- सचिन वाझेंचे पाय खोलात; अंतरिम जामीन न्यायालयाने नाकारला
- ‘…लवकरच शिववडापाव बरोबर शिवशिरखुर्मा ही राज्यातील जनतेला चाखायला मिळेल’
- मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधम बापाला ५ वर्षे सक्तमजुरी
- रश्मी ठाकरेंसह वायकरांवर गंभीर आरोप केल्यानंतर आता सोमय्यांना मानहानीची नोटीस


