🕒 1 min read
हिंगोली : राज्यात कोरोनाचा पुन्हा धोका वाढू लागला असून राज्यासमोर उभा राहिलेल्या डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटमुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. एका बाजूला राज्य सरकार कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा काढण्यात आला होता. या दौऱ्यावर भाजपसह अनेकांनी टीका केली होती.
आता राज्यात शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत असल्याचा कांगावा करत अखेर राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज हिंगोली येथे पत्रकार परिषदेत सांगितले.कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होईल त्यावेळी परभणी जिल्हयातून ही यात्रा सुरू करु असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या दुसरा टप्प्याला मराठवाड्यातील तुळजापूर इथून २४ जूनपासून सुरू करण्यात आली. त्यात यवतमाळ मधील उमरखेड हा एक मतदारसंघ होता आणि पुढे २२ मतदारसंघात म्हणजे उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली हे चार जिल्हे आणि यातील २३ मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे राष्ट्रवादीने विरोधी पक्षाला दिली स्वतः टीका करण्याची संधी असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातही राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बुथ कमिट्या स्थापन करण्याचे व संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. मराठवाडयात जिथे जिथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा गेली तिथे तिथे महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले शिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटीही दिल्या. यावेळी मोठी गर्दी झाल्याचे वारंवार समोर येत होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘चिलापी मासे मीच उजनी धरणाच्या जलाशयात सोडले!’; पवारांनी सांगितली आठवण
- ‘वडेट्टीवार बोगस, फंटूस आणि फडतूस माणूस… आता त्यांनी बीडमध्ये येऊन दाखवावं’
- कोणत्याही चौकशीला मी घाबरत नाही असे छातीठोकपणे सांगणारे देशमुख आज पळवाट शोधत आहेत ?
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
