🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी साठी राजकीय नेत्यांनी धावपळ पाहायला मिळत आहे. असेचं चित्र श्रीगोंदा मतदारसंघात दिसून येत आहे. उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
या बैठकीत नागवडे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली होती. यात राजेंद्र नागवडे यांनी उमेदवारीविषयी चर्चा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपाचे नेते आपणास श्रीगोंदा मतदारसंघात आमदारकीची उमेदवारी देत असतील तर जय श्रीराम म्हणा.. उमेदवारी मिळत नसेल रामराम सांगा असा नारा लगावला आहे. त्यामुळे उमेदवारी नाही मिळाली तर नागवडे पक्षाला रामराम करणार हे निश्चित आहे.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमचे स्थानिक पातळीवर पाचपुते समर्थकांशी जुळणार नाही अशी परिस्थिती आहे. तरी तुम्ही कोणताही निर्णय घ्या. आम्ही तुमच्या बरोबर राहू. पण आपल्या हिताचा निर्णय घ्या. यात आपले भले होईल अशी भावना व्यक्त केली. यावे भाष्य करताना नागवडे यांनी कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीच होणार नाही असं विधान केले आहे.
दरम्यान, तालुक्यात सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडून येत आहे. नागवडे यांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचच्या राहुल जगताप यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे जगताप यांना बबनराव पाचपुते यांचा पराभाव करण्यात यश आले होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178559140123172864?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178558018658586624?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178553187206172672?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
