Share

Breaking : महाराष्ट्रातील भाजपची महाजनादेश यात्रा स्थगित

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय जनता पक्षाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली आहे. या यात्रेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात आज होणाऱ्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. सुषमा स्वराज यांचं काल दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं, आज दुपारी त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात ठेवण्यात येईल, त्यानंतर त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून ‘माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील गौरवशाली अध्याय समाप्त झाला आहे. सुषमा स्वराज यांनी देशासाठी केलेल्या कामांसाठी नेहमीच स्मरणात राहतील अशी भावना व्यक्त केली आहे.

स्वराज या, महिला नेत्यांसाठी आदर्श होत्या, असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे, नवी दिल्लीत आज सकाळी सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते बोलत होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी, यांच्यासह विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते, अनेक राज्यांचे विद्यमान तसंच माजी मुख्यमंत्री आणि सर्वसामान्य नागरिकांनी, सुषमा स्वराज यांचं दर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कलम ३७० ला विरोध करणं भोवलं; राजीनामा देत कॉंग्रेस खासदाराचा सरकारला पाठींबा

उद्या येऊन तुमची १ रुपया फी घेऊन जा, सुषमा स्वराजांचा हरीश साळवेंना अखेरचा फोन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!