Share

उद्या येऊन तुमची १ रुपया फी घेऊन जा, सुषमा स्वराजांचा हरीश साळवेंना अखेरचा फोन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं. मंगळवारी रात्री स्वराज यांना छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. स्वराज यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी काही तास अगोदर ज्येष्ठ वकिल हरीश साळवे यांना फोन केला होता. हरीश सावळे हे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसमध्ये कुलभूषण जाधव यांचा खटला लढत आहेत. हा खटला लढण्यासाठी त्यांनी केवळ १ रुपया फी घेतली आहे. हीच फी घेवून जाण्यासाठी सुषमा स्वराज यांनी फोन केल्याचं साळवे यांनी सांगितले आहे.

सुषमा स्वराज यांच्याशी मंगळवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी आपल्याला फोन केला होता. उद्या संध्याकाळी ६ वाजता तुम्ही तुमची फी घ्यायला असं त्यांनी सांगितले होत. अशी प्रतिक्रिया हरीश सावळे यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिली आहे. त्यांच्या निधनाने मोठी बहिण गमावली, असे भावनिक उदगार सावळे यांनी काढले आहेत.

सुषमा स्वराज मला ‘शरद भाऊ’ म्हणायच्या, त्यांचे निधन धक्कादायक – पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहत आठवणींना उजाळा दिला आहे. सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या, संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1158800909717012481?s=20

सुषमा स्वराज यांची दैदिप्यमान कारकीर्द

जन्म १४ फेब्रुवारी १९५२ हरयाणा राज्यातील अंबाला.

अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी

पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी

१९७३ मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली

१९७५ मध्ये स्वराज कौशल यांच्याशी विवाह

वयाच्या २५ व्या वर्षी हरियाणाच्या आमदार आणि कॅबिनेट मंत्री

१९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड

१९९० मध्ये राज्यसभा सदस्य

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री

नरेंद्र मोदी सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री

‘नाच्या’चं काम सोडून पाण्याचं बघा; अजित पवारांचा गिरीश महाजनांना सल्ला

सुषमा स्वराज यांच्या मंजुरीमुळे पाकिस्तानी महिलेला वैद्यकीय व्हिसा मिळणार

काश्मीरच्या मुद्द्यावरून काका-पुतणे आमने सामने, अजित पवारांनी केलं विधेयकाचं स्वागत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!