दिल्ली : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केला. यामुळे बीसीसीआयने तातडीची बैठक बोलावली आणि अनिश्चीत काळासाठी आयपीएल स्पर्धा स्थगित केली.
स्पर्धा रद्द झाल्यानंतर अनेक खेळाडू मायदेशी परतले. मात्र न्युझीलंडचे खेळाडू याला अपवाद होते. कारण न्युझीलंडला इंग्लंडमध्ये जागतीक कसोटी चॅम्पीयनशीपचा अंतिम सामना खेळायला जायचे होते. मात्र ११ मे पर्यंत इंग्लंडमध्ये भारतातून केवळ इंग्लंडच्या नागरीकांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे न्युझीलंडच्या खेळाडूंना नाईलाजास्तव भारतात रहावे लागत होते. मात्र यादरम्यान दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे न्युझीलंडच्या काही खेळाडूंनी वेळेपुर्वीच भारतातून मालदीवला रवाना झाले आहे.
जागतीक कसोटी चॅम्पीयनशीपच्या संघाचा भाग असलेले खेळाडू केन विल्यमसन, काईल जेमिसन आणि मिशेल सँटेनर यांनी भारतातील कोरोना परिस्थीती बघुन मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला आहे. न्युझीलंडला इंग्लंडमध्ये २ कसोटी सामन्याची मालिका आणि जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचा विस्फोट! अत्यंत गरज असेल तरच आरोपीला अटक करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
- केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय! रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक नाही
- ‘केकेआर’च्या प्रसिद्ध कृष्णाला कोरोनाची लागण
- सुखद, सकारात्मक! देशात पहिल्यांदा एका दिवसात ३ लाख ८५ हजार रुग्ण कोरोनामुक्त
- ‘कोरोना परिस्थितीत मोदी सरकारला काम करता येईना’, राष्ट्रवादीचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
