🕒 1 min read
मुंबई : इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान ऍजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात पाहुण्या न्युझीलंडने यजमान इंग्लंड संघाचा 8 गडी राखुन पराभव केला आहे. या विजयासह न्युझीलंडने दोन कसोटी सामन्याची मालिका 1-0 अशी जिंकली आहे.
न्युझीलंड संघाने दुसरा कसोटी सामन्यात विजय मिळवताच 22 वर्षापासुन इंग्लंडमध्ये मालिका विजयाचा दुष्काळ संपुष्टात आणला. न्युझीलंडने तब्बल 22 वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय साजरा केला आहे. न्युझीलंडच्या संघाने इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका 1999 साली जिंकली होती. त्यावेळी न्युझीलंडच्या संघाने स्टिफण फ्लेमिंगच्या नेतृत्वाखाली 2-1 अशा फरकाने मालिका विजय साजरा केला होता. यानंतर पुढील मालिका विजयासाठी न्युझीलंडच्या संघाला 22 वर्षाची प्रतिक्षा करावी लागली.
महत्वाची बाब म्हणजे पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्या निर्णायक सामन्यात कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत चौथ्या दिवशीच न्युझीलंडने हा विजय संपादन केला. तसेच आगामी डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी हा विजय न्युझीलंडच्या संघाचा आत्मविश्वास वाढविणारा ठरला आहे. येत्या 18 ते 22 जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान साउथहॅम्पटन येथे हा सामना खेळविण्यात येणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सोशल मीडियावर मैत्रीच्या जाळ्यात अडकली पोलीस निरीक्षक, तिघांविरोधात गुन्हा दाखल
- ‘गुंतवणुकदारांची खाती गोठवण्याच्या बातम्या निराधार’ ; अदानी ग्रुप ने दिले स्पष्टीकरण
- कार्यक्रम तोच पण भुमिका नवी; एक तपानंतर सारेगमप ‘पंचरत्न’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
- नाना पटोलेंच्या ‘त्या’ महत्वकांक्षेवर अशोक चव्हाणांच भाष्य !
- आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये विनू मंकड यांचा समावेश, सचिन तेडूंलकरने केले अभिनंदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
