🕒 1 min read
मुंबई : येत्या 18 ते 22 जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यापुर्वी आयसीसीने हॉल ऑफ फेममधील 10 दिग्गज क्रिकेटपटुंची नावे जाहिर केली आहे. यात भारताचे माजी क्रिकेटपटु वीनू मंकड यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटु वीनू मंकड यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आयसीसीने त्यांचा समावेश हॉल ऑफ फेम मध्ये केला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटु महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. या ट्विटमध्ये सचिनने, ‘आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये वीनू मंकड यांचा समावेश झाल्याचे बघुन आनंद होत आहे. भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण इतिहासातील ते उत्कृष्ट क्रिकेटपटु होते’ असे ट्विट केले आहे. हॉल ऑफ फेमचा सन्मान मिळवणारे ते ७ वे भारतीय खेळाडू ठरले आहेत.
Delighted to see the great Vinoo Mankad ji being inducted into the @ICC Hall of Fame.
He was one of the finest cricketers in the rich history of Indian Cricket. ????#ICCHallOfFame https://t.co/rdYa2gR2y2
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 13, 2021
यापुर्वी बिशन सिंग बेदी, कपिल देव, सुनील गावसकर, राहुल द्रविड,अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकर यांचा देखील या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. हॉल ऑफ फेमच्या यादीत आतापर्यंत 103 खेळाडुंचा समावेश करण्यात आला आहे. वीनू मांकड यांनी भारताकडुन 44 कसोटी सामने खेळताना 31.47च्या सरासरीने 2109 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्यांनी 32.32च्या सरासरीने 162 गडी बाद केले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- सुचेता दलाल यांचे एक ट्वीट आणि अदानींच्या संपत्तीत १ लाख कोटी रुपयांची घट
- निकृष्ट दर्जाच्या फिड्सचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कडक पावले उचला – स्वाभिमानी
- काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा अन्यथा पाठिंबा काढून घ्यावा – रामदास आठवले
- ‘सॉफ्ट सिग्नलचा नियम आयसीसीने रद्द करावा’, स्टुअर्ट ब्रॉडने केली मागणी
- दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी 17 जून रोजी महाराष्ट्रभर किसान सभेचं आंदोलन !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
