🕒 1 min read
नांदेड : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.
हे सर्व सुरु असताना शिवसेना-राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. आता नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर लक्ष असल्याचं समोर आलंय. आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री बनायचे असल्याची इच्छा नाना पटोले यांनी बोलून दाखवली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाबाबतची महत्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. तसेच काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचीही घोषणा पटोलेंनी केली. याबाबत काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नाना पटोलेंच समर्थन केलं आहे.
‘नाना पटोले हे प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली असेल तर पक्षाचा निर्णय म्हणून आम्हाला तो मान्य करावाच लागेल. तसेच, प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावे वाटते, मग पटोले यांनी तशी इच्छा बोलून दाखवली तर त्यात गैर काय?’ असा सवाल देखील अशोक चव्हाण यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘आधी दिल्लीची परवानगी घ्या मगच आघाडीचे बोला’, ‘वंचित’चा पटोलेंना टोला
- राज ठाकरे यांचा आज ५३वा वाढदिवस ; ‘या’ ठिकाणी मिळतंय ५३ रुपयांत एक लिटर पेट्रोल
- सतेज पाटलांची निष्क्रियता कोल्हापूरकरांसाठी ठरतेय जीवघेणी ! जनता म्हणतेय…
- ‘पहिले स्वबळावर आमदार निवडून आणा मग मुख्यमंत्रीपदाचं बोला’, सत्तारांचा पटोलेंना टोला
- सुचेता दलाल यांचे एक ट्वीट आणि अदानींच्या संपत्तीत १ लाख कोटी रुपयांची घट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
