🕒 1 min read
मुंबई : झी मराठी ही वाहिनी गेल्या अनेक वर्षापासुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. मागील काही वर्षात या वाहिनीने अनेक दर्जेदार कार्यक्रमाची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. मात्र यात काही कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहीले. यातीलच एक कार्यक्रम म्हणजे सारेगमप लिटील चॅम्प.
12 वर्षापुर्वी गाजलेल्या सारेगमप या कार्यक्रमातील पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर हे पाच लिटील चॅम्प अजुनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. हे पंचरत्न प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येत आहे आणि तेही सारेगम लिटील चॅम्पमधुन. पण यावेळी हे पंचरत्न हे ज्युरीच्या भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सारेगम लिटील चॅम्पच्या या पर्वात जज नसणार आहे. या कार्यक्रमाचे प्रोमो नुकतेच प्रदर्शीत करण्यात आले आहे. काही दिवसातच या कार्यक्रमाचे ऑडीशन्स सुरु होतील.
यादरम्यान पंचरत्नातील पाचही लिटील चॅम्प आता मोठे झाले आहेत. प्रत्येकानी मनोरंजन क्षेत्रात आपापला ठसा उमटवला आहे. आर्या अंबेकरने तर गायनासहीत आभिनयातही चमक दाखवली आहे. काही वर्षापुर्वी सतिश राजवाडे दिग्दर्शीत ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाद्वारे तीने आभिनयात पदार्पण केले आहे. या चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली. यादरम्यान तिने अनेक टिव्ही मालिकासाठी गाणी देखील गायली आहेत. आता सारेगम लिटील चॅम्पमध्ये पंचरत्नांना बघण्यास प्रेक्षक अतुर झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नाना पटोलेंच्या ‘त्या’ महत्वकांक्षेवर अशोक चव्हाणांच भाष्य !
- आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये विनू मंकड यांचा समावेश, सचिन तेडूंलकरने केले अभिनंदन
- सुचेता दलाल यांचे एक ट्वीट आणि अदानींच्या संपत्तीत १ लाख कोटी रुपयांची घट
- निकृष्ट दर्जाच्या फिड्सचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कडक पावले उचला – स्वाभिमानी
- पैठण एमआयडीसीतील विनावापर भूखंडाबाबत त्वरीत कारवाई करा-संदीपान भुमरे यांचे निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
