मुंबई : सोशल मीडियावर मैत्री करुन नंतर फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे पोलीस विभागाच्या वतीने उघडकीस आणली जातात. मात्र, अशाच मैत्रीच्या जाळ्यात मुंबई पोलीस दलातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक अडकल्या आहेत. ब्लॅकमेल करत लैगिक अत्याचार केल्याची तक्रार त्यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात केली आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी महिलेची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीशी झाली. हा व्यक्ती एका खासगी बँकेत अधिकारी पदावर कार्यरत होता. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. या व्यक्तीने आपल्याला फसवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडीतेने केला आहे.
या प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आरोपी पीडीतेला सतत ब्लॅकमेल करत असल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. तसेच आरोपीने पीडीतेचा व्हिडीओ देखील तयार केल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आधी दिल्लीची परवानगी घ्या मगच आघाडीचे बोला’, ‘वंचित’चा पटोलेंना टोला
- राज ठाकरे यांचा आज ५३वा वाढदिवस ; ‘या’ ठिकाणी मिळतंय ५३ रुपयांत एक लिटर पेट्रोल
- सतेज पाटलांची निष्क्रियता कोल्हापूरकरांसाठी ठरतेय जीवघेणी ! जनता म्हणतेय…
- ‘पहिले स्वबळावर आमदार निवडून आणा मग मुख्यमंत्रीपदाचं बोला’, सत्तारांचा पटोलेंना टोला
- सुचेता दलाल यांचे एक ट्वीट आणि अदानींच्या संपत्तीत १ लाख कोटी रुपयांची घट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
