Share

मुंबई लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली होणार ? रावसाहेब दानवेंच्या विधानानंतर राजेश टोपे म्हणाले…

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून राज्यात पुन्हा निर्बंध कडक केल्यानंतर मुंबई लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या विस्तार दोन दिवसांपूर्वी पार पडला. भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. आपल्या पदाचे सूत्र स्विकारताच दानवे यांनी लोकलबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी पदभार स्वीकारताना दिलं आहे.

‘जेव्हा राज्याला वाटेल कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे. तेव्हा राज्याने यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर त्यावर योग्य आभ्यास करून त्याठिकाणी रेल्वे व्यवस्था सुरळीत करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. राज्य सरकारने विनंती केल्यास तातडीने लोकल सेवा सुरु करु’ असं दानवे म्हणाले आहे. यामुळे मुंबईकरांना लोकल प्रवासाचा दिलासा मिळण्याबाबत आशा निर्माण झाल्या आहेत.

याबाबत आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील भाष्य केलं आहे. आम्ही रेल्वे मंत्रालयाशी पुढील चर्चा करून नक्कीच या संदर्भातला विचार करू. रेल्वे सुरू करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय रेल्वे प्रशासनचं घेऊ शकतं, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग याबाबत काही हालचाली करणार का हे महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!