Share

भाजप नगरसेवक व पदाधिकार्यांचा तडकाफडकी राजीनामा, औरंगाबादमध्ये मोठा भूकंप

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी औरंगाबाद शहरासाठी 1680 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती त्याचे टेंडर निघाले मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच डिसेंबर रोजी अध्यादेश काढून स्थगिती दिली. या पाणीपुरवठा योजनेत स्थगिती दिल्यामुळे भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी काल राजीनामा दिला.

महापालिकेतील या पाणी पुरवठा योजनेचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेसोबतची युती भाजपने सोडली असून आता भाजप महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याची माहिती आमदार अतुल सावे व शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कालच्या राजीनाम्याने नाट्यानंतर भाजपच्या जिल्हा कार्यालयात सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली, यासह सर्व भाजपच्या नगरसेवक व महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले असल्याचेही सावे यांनी सांगितले.

या राजीनामाच्या पार्श्वभूमीवर  जिल्हा भाजप कार्यालयात मनपा पदाधिकारी तसेच सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामा दिले. हे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येईल व येत्या दोन दिवसात याविषयी बैठकी होणार आहे. उपमहापौरांनी महापौरांकडे राजीनामा द्यावा अशा आशयाच्या काही बातम्या आल्या होत्या. ‘आम्ही सोमवारी महापौरांकडे उपमहापौरांना राजीनामा सादर करणारे तत्पूर्वी महापौर हे युतीच्या मतावर निवडून आले त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करणार आहोत’. असेही ते म्हणाले.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड म्हणतात, ‘शिवसेनेतर्फे नेहमी संभाजीनगर चा उल्लेख केला जातो. माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आवर्जून संभाजीनगर चा उल्लेख करतात. यामुळे शिवसेनेने महापालिकेत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मांडावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ. यासह जिल्हा परिषदेतही ठराव मांडावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

शिवसेनेकडून नेहमीच ‘आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो’ असे सांगण्यात येते मात्र आम्ही थेट राजीनामा देतो, राजीनामे खिशात घेऊन फिरत नाही, असा टोला माजी महापौर भाग भगवान घडामोडे यांनी शिवसेनेला लगावला.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1205814316307320833?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1205811930348175361?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!