टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपाटावर शह काटशह चं राजकारण सुरु झालं आहे. कधी कोण कोणाच्या गळ्याला लागेल आणि कोण कोणाची साथ सोडेल याचा काही नेम नाही. वार फिरेल तसं विरोधी पक्षाचे आमदार टोपी फिरवू लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक व्यक्तव्य केले आहे. वडेट्टीवार म्हणाले, मला शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी मातोश्रीवरुन वारंवार फोन येत आहेत. काही दिवसांपासून वर्षावरुन आणि वांद्रेयेथून येणारे फोन जास्त आहेत. तसेच मला भेटायला बोलवत आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच वांद्रे येथून आतापर्यंत एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल 25 वेळा फोन आल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.
दरम्यान, सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेक आमदारांनी भाजपचा रस्ता धरल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली असताना सत्ताधाऱ्यानी राष्ट्रवादीच्या दिग्गज आमदारांना आपल्या पक्षात सामील करून घेतल्याने राष्ट्रवादी पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात बॉम्ब, अज्ञाताच्या फोन मुळे खळबळ
मी माढ्यात पाच लाख मते घेतली,त्यांनी सांगलीत लढून दाखवावं ,खोतांचं शेट्टींना आव्हान
तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांना सरकार जबाबदार, त्वरित ३०२ गुन्हा दाखल करा : वडेट्टीवार
राधाकृष्ण विखेंची अवस्था आता ‘उठ म्हटले की उठायचे आणि बस म्हटले की बसायचे’ : वडेट्टीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

