Share

गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात बॉम्ब, अज्ञाताच्या फोन मुळे खळबळ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील संपर्क कार्यालयाबाहेर बॉम्ब ठेवल्याचा खळबळजनक फोन आल्याने जळगावात भीतीचं वातावरण निर्माण झाल होतं. बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने पोलिसांनी कार्यालयाची आणि परिसराची तपासणी केली असता बॉम्ब अथवा त्यासंबधी कुठलीही वस्तू सापडली नाही. त्या नंतर ही एक अफवा असल्याची माहिती समोर आले.

सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास जळगाव पोलीस नियंत्रण कक्षात अज्ञात व्यक्तीने फोन करून, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका वाहनात बॉम्ब असल्याची माहिती दिली. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा फोन काही मिनिटांनी गेला.

दरम्यान पोलिसांना ज्या क्रमांकांवरून फोन आले त्यांची माहिती पोलीस घेत आहेत. ही अफवा ज्याने पसरवली त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन ही अफवा होती. अफवा पसरवून पोलीस यंत्रणेस वेठीस धरणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी गिरीश महाजन यांच्या कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!