🕒 1 min read
औरंगाबाद : १६८० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र ही योजना पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत शहरवासीयांना पाण्याची कमतरता पडू नये यासाठी साधारणपणे १५ ते २० एमएलडी पाणी वाढवण्याचे नियोजन केले जात आहे. औरंगाबाद शहरात आठवड्यातून दोनवेळा पाणी देण्याविषयी मनपा आयुक्तांना सांगितले असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी (दि.२८) दिली. सरदार वल्लभभाई पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
शहराच्या दोन्ही योजनांद्वारे होणारा पाणीपुरवठा अपुरा ठरत असल्याने राज्य सरकारने शहरासाठी १६८० कोटी रुपयाची नवीन जलयोजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेच्या कामास आता सुरूवात देखील झाली आहे. एमजेपीच्या माध्यमातून या योजनेचे काम केले जात असून त्यांनी जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीकडून सध्या नऊ जलकुंभ, दोन एमबीआर व एक जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. नो नेटवर्क एरियाला देखील पाणी देण्यात येईल, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जाहिर केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत देसाई यांनी, शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेऊन येत्या सहा महिन्यांपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आणि मनपाने एकत्रित प्रयत्नातून शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठीचे प्रयत्न करावे असे निर्देश दिले. त्यादृष्टीने पाणीपुरवठा साठवण क्षमता वृध्दी करण्यास प्राधान्य देऊन पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढवावी. शहराच्या जुन्या भागातील ज्या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती आवश्यक असेल त्याठिकाणी ती तातडीने करुन घ्यावी, असे निर्देशित केले.
यावर मनपा आयुक्तांनी सांगितले, शहराच्या पाणी साठ्यात वाढ करुन जास्तीत जास्त पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने मनपा प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने रोझाबाग, हर्सूल, दिल्लीगेट या शहरातील जुन्या भागातील त्याचसोबत सिडको परिसरातील पारिजात नगर, किटली गार्डन, याठिकाणच्या जुन्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून पाणी साठवण क्षमता वाढवण्यासही प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद महापालिकेत पदभरतीचा मार्ग मोकळा, पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश!
- जायकवाडीतून १ टिएमसी पाणी वॉटरग्रीड योजनेसाठी घेतल्यास शेती सिंचनाला फरक पडणार नाही- संदीपान भुमरे
- ‘अनिल देशमुख हे जेलमध्ये जाणारच; ते भुजबळांच्या मार्गावर’; भाजप नेत्याचं धक्कादायक विधान
- पुणेकरांनो काळजी घेण्याची हीच ती वेळ ; वाचा शहरातील कोरोना स्थिती
- संजय राऊतांच्या भेटीगाठी वाढल्या; नेमकं पडद्यामागे काय सुरु आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
