Share

व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर; ‘हाय क्वालिटी’ व्हिडीओ पाठवणे होणार सोपे

Published On: 

मुंबई: देशात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या मेसेजिंग अ‍ॅप केवळ तरुण वर्गालाच नाही तर सर्वांनाच हे अ‍ॅप सोईचे आहे. व्हॉट्सअ‌ॅप नेहमीच त्यांची युजरसाठी विविध फिचर घेऊन येत असतो. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅप युजरसाठी लवकरच नवीन फिचर घेऊन येत आहे. ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप हाय-क्वालिटी असणारे व्हिडीओ पाठवण्यासाठी युजर्सना क्वालिटी निवडता येऊ शकणार आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हिडीओ पाठवताना हाय-क्वालिटी व्हिडीओ रिझॉल्युशन निवडण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही आहे. जेव्हा हाय-क्वालिटी असणारे व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाठवले जातात तेव्हा के कम्प्रेस्ड करून किंवा डॉक्यूमेंटच्या माध्यमातून पाठवले जातात. WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप या फीचरची चाचणी करत असून, ज्यामध्ये युजर्सना त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना हाय क्वालिटी व्हिडीओ पाठवता येतील. हे नवीन फीचर अँड्रॉइट बीटा बिल्डमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं.

व्हिडीओ पाठवण्यासाठी तीन पर्याय

  • ऑटो मोड आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओची क्वालिटी स्वत: निवडेल आणि त्यामध्ये एक चांगला कम्प्रेशन अल्गोरिदम प्रदान केला जाईल.
  • युजरला चांगली क्वालिटी निवडण्याचा पर्याय दिला जाईल. यामध्ये युजर त्याच्या आवश्यकतेनुसार चांगल्या क्वालिटीचा पर्याय निवडू शकतो. यानुसार जर युजरने कोणताही व्हिडीओ हाय-रिझॉल्युशनमध्ये शुट केला असेल तर तो व्हिडीओ त्याच क्वालिटीमध्ये त्याला समोरच्याला पाठवता येणार आहे.
  • डेटा सेव्हरचा असेल. जर युजरने हा पर्याय निवडला तर व्हॉट्सअ‍ॅपकडून हा व्हिडीओ पाठवण्याआधी कम्प्रेस केला जाईल. लवकरच हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!