Share

बुलडाण्यात समाधानकारक पाऊस; ६६ टक्के पेरण्या आटोपल्या!

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा: मृग नक्षत्र कोरडे गेल्याने काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या तर काही ठिकाणी झालेली पेरणी झालेली पिके पावसाच्या दडी मुळे धोक्यात सापडले होते. मात्र २८ जूनच्या पावसाने जिल्ह्यात दमदार एंट्री केली त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रफळा पैकी सुमारे ४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी आटोपली असून जिल्ह्यात सुमारे ६६ टक्के इतकी पेरणी आतापर्यंत झाली आहे.

खरीप हंगामातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या होत्या, जिल्ह्यात ७ लाख ३४ हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी २१ जून पर्यंत तीन लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, काही शेतकऱ्यांनी पावसाच्या सुरुवातीला म्हणजेच मृग नक्षत्रात पेरणी आटोपली होती मात्र पाहिजे तसा पाऊस न झाल्यामुळे पेरणी करणारे शेतकरी दुबार पेरणीच्या संभाव्य संकटामुळे चिंतेत होते, तर काहींची पेरणी लांबणीवर पडली होती.

दरम्यान २८ जून रोजी पावसाने जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता, त्यानंतर जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला. घाटावरील तालुक्यात मुसळधार तर घाटाखाली तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला गती मिळाली आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद व इतर कडधान्यांची पेरणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!