मुंबई : आपल्या अजब-गजब वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूडमधील कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंत ही पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात गेली होती. तिथे तिने खळबळजनक खुलासे केले होते. बिग बॉस 14 संपला. पण राखी सावंतची चर्चा मात्र संपली नाही कोणत्या न कोणत्या कारणामुळे राखी सतत चर्चेत येत आहे. आत तर राखीने हद्दच केली ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड अदांनी घायाळ करणारी राखी आता सोज्वळ भूमिकेच्या शोधात आहे ते तर ठीक आहे पण तिला त्यातही आईची भूमिका साकारायची आहे. पण प्रेक्षकवर्ग राखीला आईच्या भूमिकेत स्वीकारणार हा मोठा प्रश्न आहेच. यामुळे ती चर्चेत आली आहे.
एका मुलाखतीदरम्यान राखी म्हणाली, ‘मला पुढील फिल्ममध्ये तैमूरच्या आईची भूमिका करायला फार आवडेल. तुला पुढे कोणती भूमिका साकारायला आवडेल असा प्रश्न विचारला त्यावेळी तिने तैमूरच्या आईची भूमिका साकारायला आवडेल असं म्हणाली. तैमूर खूप क्यूट आहे. तो सुपरस्टार होईल. तैमूर मोठा झाल्यावर मला त्याच्या आईची भूमिका करायची आहे. असं राखी म्हणाली. यामुळे राखी आता भलतीच ट्रोल होत आहे. सध्या ‘ड्रीम मे एंट्की हिट हो गया’ हे राखीचे गाणे हिट होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीसोबत छेडछाड केल्याप्रकरणी अटक
- मराठी कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, व्हिडिओद्वारे सांगितलं सुसाईडचे कारण
- बुलडाण्यात समाधानकारक पाऊस; ६६ टक्के पेरण्या आटोपल्या!
- अण्णा हजारे हे कायम कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निशाण्यावर का असतात ?
- ‘देशात मुर्खता मोठ्या प्रमाणात’ ; मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर भडकली सोना मोहपात्रा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

