🕒 1 min read
मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मंदिरा बेदी हिने ‘शांती’ आणि ‘क्यों’ की सास भी कभी बहुती’ या मालिकेतून लोकांच्या मनात घर केल आहे. परंतु नुकतेच तिचे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. यामुळे मंदिरा आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज कौशल यांच्या निधनाची बातमीमुळे बॉलिवूडमध्ये देखील शोक व्यक्त केला.
पतीच्या मृत्यूनंतर मंदिरा बेदी अंतिम यात्रेमध्ये पार्थिव उचलताना आणि अंतिम संस्काराचे विधी करताना दिसून आली होती. कित्येक वर्षापासून चालत आलेल्या परंपरा मोडत तिने पतीच्या अंतिम संस्काराच्या विधी पार पाडल्या. यावरून तिला सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं तर काहींनी तिचं कौतुकही केलं.
That some people are still commenting on Mandira Bedi’s dress code or choice to carry out her husband Raj Kushal’s last rites shouldn’t surprise us. Stupidity is more abundant than any other element in our world after all ..
— Sona Mohapatra (@sonamohapatra) July 2, 2021
यात मंदिरा बेदीची बाजू घेत अभिनेत्री सोना मोहपात्रा ट्रोलर्सवर भडकलीय आहे. ट्विट करत तिने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे. या ट्विटमध्ये तिने लिहिल आहे की, ‘काही लोक अजुनही मंदिरा बेदीने पती राज कौशल यांच्या अंतिम संस्कार प्रसंगी परिधान केलेल्या कपड्यांवरून ट्रोल करत आहेत…याचं जास्त आश्चर्य वाटत नाही…शेवटी आपल्या देशात इतर गोष्टींपेक्षा मुर्खता मोठ्या प्रमाणात आहे.’
महत्वाच्या बातम्या
- लेकं वामिकासह इंग्लंडमध्ये फिरताना दिसली अनुष्का ; यावेळीही चाहते निराश
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- ‘गब्बर’च्या टीमचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण ; सरावाला सुरवात
- ‘अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती देखील भरमसाठ वाढलीये’; ईडी कारवाईवरून नाना पटोलेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

