मुंबई : दिवगंत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आज आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.
राजू साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितल आहे. ‘नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचारपूर्वक मी हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. हा व्हिडीओ बनवताना मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे.’
पुढे ते म्हणाले, मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मोर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत. माझं पुढचं काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीत. माझ्याकडे सध्या ५ प्रोजेक्ट आहेत. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत असल्याचं साप्ते यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. तसेच, मला न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी याच व्हिडिओ द्वारे केली आहे.
त्यांच्या या व्हिडीओने एकच खळबळ उडाली आहे. सध्या यांच्या आत्महत्येनंतर यावर चर्चा होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करणार असून पुढे यावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- १५ वर्षाच्या संसारानंतर आमिरने घेतला किरणशी काडीमोड
- लेकं वामिकासह इंग्लंडमध्ये फिरताना दिसली अनुष्का ; यावेळीही चाहते निराश
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- ‘गब्बर’च्या टीमचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण ; सरावाला सुरवात


